माझा आवडता खेळ खो खो निबंध मराठी। Maza avadta khel kho kho nibandh।

 माझा आवडता खेळ खो खो निबंध मराठी। Maza avadta khel kho kho nibandh।essay on Maza avadta khel kho kho.


माझा आवडता खेळ खो-खो आहे. खो-खो हा खूप लोकप्रिय खेळ आहे. या खेळामध्ये माझी एक उत्तम खेळाडू म्हणून ओळख आहे.खो-खो हा खेळ दोन संघामध्ये खेळला जातो. प्रथम पंच नाणेफेक करण्यास सांगतात. नाणेफेक जिंकणारा संघ पळती किंवा पाठलाग यांची निवड करतो. या खेळात १२ खेळाडू असतात. त्यातील ९ खेळाडू प्रत्यक्ष खेळात भाग घेतात आणि तीन खेळाडू राखीव असतात.

खो-खो खेळासाठी जास्त साधनांची गरज नसते. मैदानात दोन बाजूला दोन खांब उभे करावे लागतात. १२ पैकी ९ खेळाडू मैदानात दोन्ही खांबादरम्यान एका रांगेत गुडघ्यावर बसतात. ते सर्व खेळाडू एकमेकांच्या विरुध्द बाजूला तोंड करून बसतात.

बसलेले खेळाडू हे दुस-या संघाच्या खेळाडूला शिवण्याचा प्रयत्न करतात. तर पळणारे ३ खेळाडू विरोधी संघाच्या सदस्यांचा स्पर्श टाळण्याचा प्रयत्न करतात. दोन्ही संघाला एक एक खेळाकरिता ७मि. वेळ देण्यात येतो.

दोन्ही डावांच्या शेवटी ज्या संघाला जास्त गुण असतील तो संघ विजयी घोषित होतो. मी या खेळात अनेक पुरस्कार मिळवले आहेत. या खेळामुळे आपली निर्णयक्षमता वाढते. आपल्या जीवनातील ताण-तणाव कमी होतो.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now