Dr b.r Ambedkar Marathi nibandh।डॉ अंबेडकर जयंती पर निबंध मराठी।

 Dr b.r Ambedkar Marathi nibandh।डॉ अंबेडकर जयंती पर निबंध मराठी।Dr b.r Ambedkar per nibandh Marathi mein.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक भारतीयासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर हे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील मह या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई हे होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लहानपणा- पासून खूप हुशार व महत्वाकांक्षी होते. ते शालेय जीवनात १८ तास अभ्यास करत असत. त्यांनी बडोद्‌याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक साहाय्याने परदेशात जाऊन एम.ए. पीएच.डी. या अर्थशास्त्र विषयात ‘ पदव्या मिळवल्या व बॅरिस्टर बनले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपण माणसाला माणूसण मिळवून देणारे अलो- किक व्यक्तिमत्व म्हणून ओळखतो. महाड सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश, मनुस्मृती दहन, हिंदू कोड बील अशी इतर अनेक सामाजिक कार्य केली. स्त्री वर्ग, शेतकरी, मजूर, पददलित, समाजाला त्यांनी समतेची वाट दाखवून दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील जातीव्यवस्थेविरुद्ध जोरदार लढा दिला. त्यांनी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म ‘स्वीकारला. विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांनी ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ हा अमूल्य संदेश समाजाला दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांचा आहेत. भारतीय संविधानात सिंहाचा वाटा आहे. अश्या या थोर सिंहाचा महामानवाचे ६ डिसें- बर १९५६ रोजी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले.

डॉ. बाबासाहेब हे भारताचेच नाही तर या विश्वाचे महामानव आहेत. त्यांची जयंती आपण दरवर्षी १४ एप्रिलला ‘आंबेडकर जयंती’ व पुण्यतिथी छ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन’ म्हणून साजरी करतो. असे हे सर्वांना वंदनीय असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now