Mahatma Gandhi Bhashan Marathi।महात्मा गांधी खूप सोपे आणि सुंदर भाषण मराठी।
१. सर्वांना माझा नमस्कार.
२. माझे नाव परी आहे.
३. आज २ ऑक्टोंबर गांधी जयंती ! यानिमित्त मी महात्मा गांधीजी विषयी चार शब्द सांगणार आहे.
४. महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोंबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला.
५. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते.
६. महात्मा गांधीजी हे भारताचे एक महान नेता
होते.
७. आपण त्यांना प्रेमाने ‘बापू’ आणि ‘राष्ट्रपिता’ असेही म्हणतो.
८. महात्मा गांधीजींची राहणी साधी आणि विचार उच्च होते.
९. त्यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.
१०. दुर्देवाने, ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीजींनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम । जय हिंद, जय भारत।