Majhe Gaon Nibandh Marathi।Essay on my village in marathi।माझे गाव निबंध मराठी।
माझ्या गावाचे नाव गणेशनगर आहे. माझे गाव खूप सुंदर आणि छोटे आहे. माझ्या गावातील वातावरण शांत आहे. गावाच्या चोहोबाजूंनी हिरवीगार झाडी आहे. माझ्या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. माझ्या गावातील शेतात ऊस, मका, द्राक्षे, भुईमुग, हुलगा, मूग इ. पीके घेतली जातात. काही लोक पशुपालन आनंदाने करतात.
माझ्या गावात सर्व सोयी-सुविधा आहेत. बैंक, पतसंस्था, वाचनालय, दूध डेअरी, छोटी – मोठी दुकाने, पोस्ट-ऑफिस, शाळा इ. अनेक सुविधा गावात आहेत. गावाच्या मध्यभागी श्री गणेशाचे प्रसिध्द मंदिर आहे. अनेक लोक दूरवरून या मंदिरात येतात.
माझ्या गावात विविध जातीधर्माचे लोक आनंदाने एकत्र राहतात. आपल्या विचारांची देवाणघेवाण करतात. एकमेकांना संकटकाळी मदत करतात. माझ्या गावात प्रत्येक घरात शौचालय आहे. गावातील सर्व लोक साक्षरतेला महत्त्व देतात.
गाव आहे. गावातील प्रत्येक गल्लीत देखणे आणि स्वच्छ रस्ते आहेत. माझ्या गावात पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था आहे.असे माझे गाव एक आदर्श गाव आहे. मला माझे गाव खूप खूप आवडते.