Essay on avadta chand marathi nibandh। माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध। maza avadta chand nibandh.
माझा आवडता छंद वाचन आहे. मला गोष्टी, आत्मकथा, कविता, प्रवासवर्णनपर, कांदब-या इ. वाचायला खूप आवडतात. मी नामवंत लेखकांची अनेक पुस्तके वाचली आहेत. जसे, श्यामची आई, अग्निपंख, छावा, श्रीमान योगी, मृत्युंजय, ययाति इ.
मी मोकळ्या वेळेत पुस्तक वाचन करते. वाचन हा माझा लहानपणापासूनचा छंद आहे. माझ्या वडिलांनी मला वाचनासाठी अनेक पुस्तके आणली आहेत. वाचनामुळे मला अनेक फायदे झाले आहेत.
पुस्तक वाचन केल्याने माझे ज्ञान वाढत आहे. मला नव-नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. वेळेची किंमत, अंतरिक्ष माहिती, समुद्र तसेच पृथ्वीवरील प्राणी-पक्षी यांची माहिती, तंत्रज्ञानातील नव-नवीन शोध इ. माहिती,
वाढत आहे. मला नव-नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. वेळेची किंमत, अंतरिक्ष माहिती, समुद्र तसेच पृथ्वीवरील प्राणी-पक्षी यांची माहिती, तंत्रज्ञानातील नव-नवीन शोध इ. माहिती पुस्तकातून मी मिळवली आहे.
पुस्तक माझे चांगले मित्र आहे. वाचनाने माझी स्मरणशक्ती वाढली आहे. मला कधीच एकटे वाटत नाही. वाचन सवय मला सोन्यापेक्षा मौल्यवान वाटते. मी असाच माझा आवडता छंद वाचन जोपासत जाईन.